हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांचे नेते कोश्यारी यांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण यावेळी सुद्धा त्यांनी राज्यपालांना विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण करून दिली.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटल कि, “महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!,” असं म्हणत राऊत यांनी राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त
गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील.
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2021
दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्यातील ठाकरे सरकार यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांनी राज्यपालांचा खरपूस शब्दात समाचार देखील घेतला होता . तसेच यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये पत्राद्वारे शाब्दिक आरोप – प्रत्यारोप झाले होते.




