शिवथाळीसाठी आधार कार्ड गरजेचे, ही केवळ अफवा- मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । शिवथाळीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीची सक्ती करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही केवळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या महत्वाकांशी शिवथाळी योजनेत गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण दिले जाणारा आहे. या जेवणाची किंमत केवळ १० रुपये ठेवण्यात आली आहे. शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.शिवथाळीसाठी आधार कार्ड दाखवावे लागेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र यात तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयानं आता स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिवथाळीसाठी आधार कार्ड दाखवावे लागणार असल्याच्या वृत्तावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. गरीबाला जेवू घालताय, का त्याची थट्टा करताय असा संतप्त सवाल भाजपा आमदार राम कदम त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “१० रुपयात जेवणाची थाली… असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत. आहो गरीबाला जेवू घालताय का त्याची थट्टा करताय. आमची मागणी आहे. बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे”.

रॅम कदम पुढे लिहितात की, “बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे”. विरोधकांच्या या टिकेनतंर आता सरकारकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात अली नसल्याचे सांगितल्याने हा वाद संपल्याचे संकेत दिले आहेत.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मुंबईतील नाईट लाईफला हिरवा कंदील; मंत्रिमंडळाची मंजुरी,२७ जानेवारीपासून अंमलबजावणी

‘तुकडे तुकडे गँग’च सरकार चालवतय, शशी थरुर यांचा अमित शहांवर हल्लाबोलसाईबाबा आमचेसुद्धा,

राज्यभरातून नागरिकांची कोट्यवधी रुपये देण्याची मागणी

 

Leave a Comment