महाराष्ट्रातील भाजप हे एक अजब रसायन, खोटं बोलण्याची हिंमत येते कुठून?? शिवसेनेची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असतानाच आम्हाला क्लीन चीट मिळाली अशा बोंबा ठोकणारे महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन आहे. रेटून खोटे बोलण्याची, दुसऱ्यांवर यथेच्छ चिखल फेकण्याची हिंमत व आत्मविश्वास त्या रसायनातून येतो?? कोणाच्या प्रेरणेतून तयार होते हे अजब-गजब रसायन?, अशी उपहासात्मक टीका शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केली आहे.

भारतीय जनता पक्ष हे एक अजबच रसायन आहे. हे लोक आपल्या राजकीय विरोधकांवर बेफाम आरोप करत सुटतात. हवा तसा चिखल उडवतात. तक्रारदारही तेच व फौजदारही तेच असतात. दुसऱ्यांना बाजू मांडण्याची ते संधीच देत नाहीत. त्याच वेळी स्वतःवर जे आरोप पुराव्यांसह होत आहेत त्याबाबत ते स्वतःच स्वतःला क्लीन चिट देत सुटले आहेत यास काय म्हणावे? जलयुक्त शिवार योजनेतील ‘भ्रष्ट’ व्यवहारास क्लीन चिट मिळाली असून फडणवीस सरकारचे याबाबत गंगास्नान झाल्याचा डंका भाजप गोटातून पिटला जात आहे असे शिवसेनेने म्हंटल.

जलयुक्त शिवाराला कोणीही क्लीन चिट दिली नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. जलयुक्त शिवाराच्या सुमारे 71 टक्के कामध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले असून एसआयटी’च्या अहवालाप्रमाणे सरकारने सर्व जिल्हा यांना यापूर्वीचौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकायांनी एसआयटीच्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेले नाहीत. चौकशी संपलेली असताना सरकारने जलयुक्त शिवार अभियानाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न येतोच कोठे, असा तगड़ा खुलासा अलसंधारण विभागाने बुधवारी केला आहे. हे सरकारचे स्पष्टीकरण आहे. आता सरकार खोटे बोलते आहेच आम्ही गंगास्नान करून पापक धुवून टाकली आहेत, असे जलयुक्त शिवाराची डबी करणायाना म्हणायचे आहे काय असे शिवसेनेनं म्हंटल.

जलयुक्त शिवार योजनेचे लाभार्थी हे राजकीयच निघाले. शेतकयांचे शिवार कधीच भिजले नाही. खोटेपणाचा कळस असा की, या योजनेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची चौकशी सुरू असतानाच ‘आम्हास क्लीन चिट मिळाली’ अशा बोबा ठोकायला या लोकानी सुरुवात केली. पुन्हा या बोंबाबोंबीस सत्य वगैरे जिंकल्याचा मुखवटा चढवून नाचायला सुरुवात केली. हा तर अजब प्रकार आहे. म्हणूनच आम्ही म्हणतीय, महाराष्ट्रातील भाजप हे एक अजब रसायन आहे. रेटून खोटे बोलण्याची, दुसऱ्यांवर प्रदेव दिखल ऐकण्याची हिंमत व आत्मविश्वास त्या रसायनातून येतो. कुठे मिळते हे अजब रसायन? कोणाच्या प्रेरणेतून तयार होते है अजब गजब रसायन? अशी टीका शिवसेनेनं केली.

Leave a Comment