हा तर बेशरमपणाचा कळस ; शिवसेनेचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होत असतानाच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर राग व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीसह महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर तोफ डागली आहे.

भंडाऱ्यात दहा बालकांचा मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केलं. हा बेशरमपणाचा कळस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे. या दुर्घटनेच राजकारण करणं म्हणजे या मृत बालकांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे असं सामनातून म्हंटल आहे.

केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसं काम झालं तसं करा, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, असं अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment