मुंबई प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बीजेपीला चांगलेच धारेवर धरले. बहुमत नसताना तु्म्ही म्हणता ‘आमचंच सरकार येणार’, मग आम्ही आमचे पर्याय बघायचे नाहीत, हे सांगणारे तुम्ही कोण? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बीजेपीचे चांगलेच कान पिळले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील पुढील मुद्दे-
मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, १० वेळा नाही, लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असेल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही.
गंगा तर साफ झाली नाही, पण मनं कलुषित झाली. भाजपाच्या मनात सत्तेची प्रचंड लालसा. मला वाईट वाटतं आहे, चुकीच्या माणसांसोबत कारण नसताना गेलो.
फडणवीस यांच्याशी मी बोललो नाही, कारण मला खोटं ठरवणाऱ्यांशी मला बोलायचं नाही! मला यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.