शिवतारेंची दोन लग्न, 27 वर्षांपासून राहतात अलिप्त; मुलीच्या आरोपांवर आई मंदाकिनीचे फेसबुक लाईव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी मंगळवारी पहाटे थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागातुन एक पोस्ट केली होती. त्यांनी वडील विजय शिवतारेंचा ICU मधील फोटो शेअर करत आई व भावांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर त्यांच्या आरोपांना आई मंदाकिनी यांनी आपला मुलगा विनय याच्या फेसबूक अकाऊंटवरून लाइव्हच्या माध्यमातुन प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पती विजय शिवतारे यांनी दोघींशी विवाह केला असून त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक जाचामुळे आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेचे नेते, माजी जलसंपदामंत्री व साताऱ्याचे माजी पालकमंत्री अशी जबाबदारी पेलणारे विजय शिवतारे यांची सध्या प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी त्यांची मुलगी ममता यांनी फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली. आपलय मुलीने केलेल्या आरोपांना आई मंदाकिनी यांनीही प्रत्युत्तर देत दावा केला आहे. तसेच मुलीने केले आरोपही धुडकावून लावले आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/290967662776010

मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात कि, काही वेळापूर्वी माझी मुलगी डॉ. ममता हिने केलेली पोस्ट मी वाचली. त्यामध्ये तिने माझा मुलगा विनय व वीस यांच्या विरुद्ध केले आरोप हे खोटे आहेत. वास्तविक पाहता माझे पती विजय शिवतारे हे गेली २७ वर्षे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. ते पहिली पाच वर्षे हे उज्वला बागवे या नावाच्या महिलेसोबत लग्न करून राहत होते. त्यानंतर ते मीनाक्षी पटेल या महिलेसोबत पूवी या ठिकाणी वास्तव करीत आहेत. आमच्यातील कुटुंबातील वादाचे खरे कारण हे संपत्तीचे नसून विजय शिवतारे यांच्याकडून जो काही मानसिक त्रास दिला जात होता. त्यातून सुटका करण्यासाठी मी व माझ्या कुटुंबाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. हा एकमेव हेतू आहे, असा दावा विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.

Leave a Comment