UIDAI च्या कोट्यावधी युझर्सना धक्का ! आधारशी संबंधित ‘या’ 2 सेवा झाल्या बंद, त्याविषयी जाणून घ्या का

Aadhar Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. UIDAI ने आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. त्याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर दिसून येईल. UIDAI ही आधार कार्ड देणारी संस्था आहे आणि वेळोवेळी त्यास संबंधीत अनेक सेवा सुरू करतात, परंतु यावेळी 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या गेल्या आहेत.

पुढील आदेश येईपर्यंत UIDAI ने Address Validation Letter द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. याशिवाय जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची सेवाही बंद करण्यात आली आहे.

1. Address Validation Letter :
पुढील आदेश येईपर्यंत UIDAI ने Address Validation Letter द्वारे आधार अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. भाडेकरू किंवा इतर आधार कार्डधारक याद्वारे आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकत होते. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून Address Validation Letter शी संबंधित पर्यायही काढून टाकला आहे.

UIDAI ने यासंदर्भात माध्यमांना सांगितले की, आपण अपडेट करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. इतर वैध अ‍ॅड्रेस पुरावांच्या https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या लिस्ट मधून आपण कोणत्याही पत्त्याच्या पुराव्यद्वारे आपला पत्ता अपडेट करू शकता.

त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ?
त्याचा परिणाम भाड्याने राहणाऱ्या लोकांवर होईल. आधार कार्डचा पत्ता अपडेट करण्यात या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, ज्या लोकांकडे पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट नाही त्यांनादेखील अडचणी येऊ शकतात.

2. Aadhaar Card Reprint शी संबंधित सेवाही थांबली
याशिवाय UIDAI ने जुन्या शैलीमध्ये Aadhaar Card Reprint ची सेवाही बंद केली आहे. पूर्वी UIDAI लांब रुंद आधार कार्ड जारी करत असत आणि त्याला Reprint करण्याची सुविधा देखील देत असे, परंतु आता त्याऐवजी ते प्लास्टिकचे PVC कार्ड देतात. हे कार्ड डेबिट कार्डच्या आकाराचे आहे. हे सहजपणे खिशात आणि वॉलेटमध्ये घेता येऊ शकते. यामुळे, UIDAI ने जुन्या शैलीचे कार्ड बंद केले आहे.

ट्विटरवर युझर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना Aadhaar Help Centre ने ट्विट केले की, “प्रिय रहिवासी, Aadhaar Card Reprint सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही आधार PVC कार्ड ऑनलाईन मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ई-आधारचे प्रिंट आउटही घेऊ शकता आणि कागदाच्या स्वरूपात ठेवू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group