नवी दिल्ली । नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनलने (NCLAT) बुधवारी OYO च्या अर्जावर दिवाळखोरीची कार्यवाही मागे घेण्यास परवानगी दिली. OYO हॉटेल्सच्या सहाय्यक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणाऱ्या अनेक हॉटेलवाल्यांना हा मोठा धक्का बसला आहे. हॉटेलवाल्याच्या वकिलाने सांगितले की, “OYO च्या अर्जास परवानगी देण्यात आली आहे आणि आमचे हस्तक्षेप अर्ज नाकारले गेले आहेत.” तथापि, यासह कंपनीच्या क्रेडिटर्सनाही थोडा दिलासा मिळाला आहे. तोडगा काढण्यासाठी त्यांना OYO कडे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे प्रकरण हॉटेलवाल्यांशी सोडवायचे की नाही ते कंपनीवर अवलंबून असेल.
नक्की काय प्रकरण आहे ?
मूळ पार्टी आणि गुरुग्राम हॉटेल मालक राकेश यादव यांच्यासमवेत OYO ने कोर्टबाहेर सेटलमेंट केली आहे. यादव यांनी NCLAT मध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. OYO ला दोन वर्षांपूर्वी यादव यांच्या वतीने नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLAT) OYO ग्रुपची सहाय्यक कंपनी ओयो हॉटेल्स अँड होम्स प्रायव्हेट लिमिटेडविरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याची विनंती मान्य केली होती.
200 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दावा
त्याचबरोबर वकील कीर जगदीशभाई शाह यांना अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्त केले गेले आणि कंपनीच्या इतर क्रेडिटर्सना दावा दाखल करण्यास सांगितले. IRP ने क्रेडिटर्सनी केलेले दावे उघड केले नाहीत. हा दावा 200 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. OYO ने या आदेशास NCLAT मध्ये आव्हान दिले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group