SBI च्या ग्राहकांना धक्का! बँकेने FD वरील व्याज दरात केली कपात, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याज दर कमी करून पुन्हा एकदा धक्का दिला आहे. SBI ने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट वरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीसाठी 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता SBI च्या FD चा फायदा कमी झाला आहे. 10 सप्टेंबर 2020 पासून हे नवीन व्याजदर लागू झालेले आहेत. यापूर्वी SBI ने 27 मे रोजी फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याज दर कमी केले होते. पारंपारिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक केली जाते.

SBI च्या FD साठीचे नवीन (10 सप्टेंबरपासून लागू) व्याज दर

7 ते 45 दिवस: नवीन व्याज दर 2.90 टक्के
46 ते 179 दिवस: नवीन व्याज दर 3.90 टक्के
180 ते 210 दिवस: नवीन व्याज दर 4.40 टक्के
211 दिवस ते 1 वर्षासाठी: नवीन व्याज दर 4.40 टक्के
1 ते 2 वर्षे: नवीन व्याज दर 4.90 टक्के
2 ते 3 वर्षे: नवीन व्याज दर 5.10 टक्के
3 ते 5 वर्षे: नवीन व्याज दर 5.30 टक्के
5 ते 10 वर्षे: नवीन व्याज दर 5.40 टक्के

SBI च्या ज्येष्ठ नागरिकांसाठी FD चे व्याज दरः

7 ते 45 दिवस: नवीन व्याज दर 3.40 टक्के
46 ते 179 दिवस: नवीन व्याज दर 4.40 टक्के
180 ते 210 दिवस: नवीन व्याज दर 4.90 टक्के
211 दिवस ते 1 वर्षासाठी: नवीन व्याज दर 4.90 टक्के
1 ते 2 वर्षे: नवीन व्याज दर 5.40 टक्के
2 ते 3 वर्षे: नवीन व्याज दर 5.60 टक्के
3 ते 5 वर्षे: नवीन व्याज दर 5.80 टक्के
5 ते 10 वर्षे: नवीन व्याज दर 6.20 टक्के

यापूर्वी बँकेने एमसीएलआर-मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR-Marginal Cost of Funds based Lending Rate) संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. SBI ने MCLR रिसेट फ्रिक्वेंसी 1 वर्षापासून सहा महिन्यांपर्यंत कमी केली आहे. घसरलेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी कर्जधारकांना वर्षासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. सध्या SBI चा एक वर्षाचा MCLR 7 टक्के आणि सहा महिन्यांचा MCLR 6.95 टक्के आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल FD प्रोडक्ट
याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने स्पेशल FD प्रोडक्ट ‘एसबीआय व्हेकेअर डिपॉझिट’ सुरू केले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रिटेल टर्म डिपॉझिटवर 5 वर्षांच्या मुदतीसाठी 30 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. ‘एसबीआय व्हेकेअर डिपॉझिट’ ही योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like