धक्कादायक! गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला व्हिसावर गेलेले 100 काश्मिरी तरुण बेपत्ता

नवी दिल्ली |  जवळपास शंभर तरुण कश्मीरवरून पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेल्या तीन वर्षात गेले होते. ते तरुण बेपत्ता आहेत. सेक्युरिटी इश्टाब्लिशमेंटने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे तरुण एकतर पाकिस्तानमधून परत आले नाहीत. किव्वा भारतात परत आले, पण आत्ता बेपत्ता आहेत. तसेच ते आत्ता दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा भाग बनले असू शकतात’. असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

या तरुणांचा एक तर ब्रेनवॉश करून त्यांना ट्रेनिंग देण्यात आले असावे किंवा ऑंटी इंडिया प्रपोगंडा मध्ये सहभागी करून घेतले असावे. या तरुणांना परत मुख्य प्रवाहात आणणे हे खूप मोठे आवाहन असणार आहे. घाटीमधील काऊंटर इन्सर्जन्सी टीमचे अधिकारी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यानी यामध्ये माहिती दिली.

एक एप्रिल ते 6 एप्रिल 2020 च्या दरम्यान सोफियन, कुळगाम आणि अनंतनाग या दक्षिण कश्मीरच्या जिल्ह्यांमधून काही तरुण पाकिस्तानला फिरण्यासाठी गेले होते. व्हिसा आणि संबंधित कागदपत्रे दाखवून हे तरुण पाकिस्तानला गेले. पण ते परत कधीच आले नाहीत. त्यानंतर त्यांना काही आतंकवादी संघटनामध्ये पाहण्यात आले. असेही संबंधित अधिकारी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like