व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या ‘या’ महिला क्रिकेटरच्या आईपाठोपाठ बहिणीचेही कोरोनाने निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे गुरुवारी तिची बहीण वत्सला हिचे निधन झाले आहे. तसेच वेदा कृष्णमुर्ती हिने दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच आपल्या आईला गमावले होते. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण मागच्या आठवड्यात कोरोनामुळे आई चेलुवम्बदा देवी यांचे तर आज बहीण वत्सला हिचे निधन झाले आहे.

२४ एप्रिलला केलं होतं ट्विट
वेदा कृष्णमूर्तीची आई चेलुवम्बदा देवी यांचे २४ एप्रिलला कोरोनामुळे निधन झाले होते. याची माहिती स्वत: वेदाने ट्विटरवरून दिली होती. तसेच माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून माझ्या बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे असेदेखील तिने आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

“आम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी खूप आभारी आहे. आई शिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल हीच अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहेत.”, असे वेदाने आपल्या ट्विटमध्ये म्हणले होते. वेदाने आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेटसाठी 47 वन-डे आणि 76 टी20 सामने खेळले आहेत.