धक्कादायक ! ‘या’ मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

मिरज शासकीय मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा दिल्लीतील लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील लॅबचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला होता. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 48 मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. अन्य काहींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुन्हा 34 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा 10 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.

एकूण 96 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यांची ओमायक्रॉनची तपासणी करण्यात आली. पुणे आणि दिल्ली येथे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्यातील अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, दिल्लीचा अहवाल आज आला. 96 पैकी 56 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.