औरंगाबाद : शहरातील जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर एका व्यक्तीवर धारधार हत्याराने पायावरती वार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, अशोक भानुदास मुळे (50, रा माळीवाडा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. रंगीन दरवाज्याजवळ जिल्हाधिकऱ्यांच्या बंगल्यासमोरून दुचाकीवरून (MH20 – AR8672 ) मुळे जात होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला व तो घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळतात बेगमपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यांनी जखमी अशोक मुळे यांना घाटीत उपचारासाठी दाखल केले.
जिल्ह्यात कायद्याचा धाक संपला का ?
औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांमध्ये खुनाच्या अनेक घटना उघडफकिस आल्या आहेत. यातच आज सकाळीच हनुमान नगर भागात देखील एका तरुणाचा तलवारीने वॉर करत खून केल्याची घटना ताजी असतानाच हि घटना घडली आहे. त्यात हि घटना खुद्द जिल्हाधिकारी यांच्या घरासमोरच घडली आहे, त्यामुळे शहरात कायद्याचा धाक संपला का असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.