धक्कादायक! १ लाख भारतीयांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड पासपोर्टचा इंटरनेटवर सेल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक लाखाहून अधिक भारतीयांच्या आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट यांसारख्या राष्ट्रीय ओळखपत्रांची स्कॅन कॉपी ‘डार्क नेट’ या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म साइबल यांनी ही माहिती दिली आहे. साइबलने आपल्या अहवालात म्हटले आहे की,हा डेटा सरकारी डेटाबेसमधून नाही तर एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरुन लीक झाला आहे. साधारणपणे तस्करी, दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी या नेटचा वापर केला जातो. कधीकधी याचा वापर संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी देखील केला जातो.

नक्की काय आहे हे प्रकरण
या ‘डार्क नेट’वरील माहितीवरून, अंदाज केला जाऊ शकतो की, हा डेटा केवायसी (नो योअर कस्टमर) कंपनीमार्फत लिक झाला आहे, कारण ‘डार्क नेट’ वर असलेल्या डेटाबेसमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टच्या स्कॅन कॉपीचा समावेश आहे. ‘डार्क नेट’ म्हणजे इंटरनेटचा तो भाग जे सामान्य सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेर असते आणि ते वापरण्यासाठी एका विशेष सॉफ्टवेअर आवश्यक आहे.

हे डॉक्युमेंट कसे लीक झाले
भारताच्या विविध भागांतील एक लाखाहून अधिक लोकांच्या ओळखपत्र मिळवल्याचा दावा. त्या वापरकर्त्याकडून सुमारे एक लाख ओळखपत्रे मिळवून ते भारतीयांची असल्याची पुष्टी सायबलच्या संशोधकांनी केली आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी फॉर्ममध्ये आहेत. ते कदाचित कंपनीच्या ‘नो योअर कस्टमर’ डेटाबेसमधून चोरीला गेले असतील. मात्र, कंपनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment