कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर उभं; WHOच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनेव्हा । कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभं आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ विषाणू स्वत:मध्ये बदल करतो. त्यामुळे औषध प्रभावी ठरत नाही. विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवते.

अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणं कोरोना महामारीप्रमाणेच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम यांनी म्हटलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे वैद्यकीय क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान आहे. एका शतकाची मेहनत यामुळे वाया जाईल. आरोग्य क्षेत्रासाठी हा अतिशय मोठा धोका असेल. विषाणूनं स्वत:मध्ये बदल केल्यास औषध त्यासमोर फारसं प्रभावी ठरत नाही. यामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारणं करू शकतं, अशी भीती ट्रेडोस यांनी व्यक्त केली.

माणूस आणि पशूंवर अधिक प्रमाणात औषधांचा वापर होत असल्यानं गेल्या काही वर्षांत अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढल्याचं ट्रेडोस यांनी सांगितलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कोणताही आजार नाही. मात्र तो आजाराइतकाच किंबहुना एखाद्या महामारीइतकाच धोकादायक आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रानं एका शतकात केलेल्या प्रगतीवर पाणी फिरेल. आज अतिशय सहजपणे होणाऱ्या संक्रमणांवरील उपचारदेखील अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे होऊ शकणार नाही, असं ट्रेडोस म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment