Wednesday, February 1, 2023

धक्कादायक ! पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज करताच पतीने अश्लील मजुकरासह फोटो केले व्हायरल

- Advertisement -

औरंगाबाद – चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारझोड केल्याने पत्नीने सासर सोडत घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीने तिच्यासोबतचे खासगी अश्लील मजकुरासह छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. पत्नीने खंबीर होत औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांत धाव घेतल्याने आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर पती हा मुकूंदवाडी परिसरात राहत होता. या प्रकरणी पत्नीने सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार मुकूंदवाडीतील तिचा ३९ वर्षीय पतीपासून तिला दोन मुले आहेत. पती दररोज चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारहाण करुन त्रास देत असे. मारहाणीला कंटाळून तिने सासर सोडून माहेर गाठले आणि घटस्फोटाची प्रक्रिया केली. सध्या घटस्फोटाचे प्रकरण कौटूंबिक न्यायालयात प्रलंबित आहे

दरम्यान तिच्या पतीसोबत काढलेले खासगी छायाचित्रे पतीने अश्लील मजकुरासोबतच सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच पीडितेच्या नातेवाईकांनाही पाठविली. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात १५ सप्टेंबर रोजीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासाअंती अश्लील मजकूरासह छायाचित्रे व्हायरल करणारा तिचा खरोखरचा पती असल्याचे समोर आले. त्याला मुकूंदवाडी, विश्रांतीनगरातून ताब्यात घेतले, असता, त्याने आधी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र त्याच्यासमोर पोलिसांनी थेट पुरावेच ठेवल्यानंतर त्याने तोंड उघडले अन् तो बोलू लागला, ‘तिने माझ्यासोबत संसार करावा, नांदायला यावे, तिच्यासह तिच्या नातेवाईकांना अद्दल घडविण्यासाठी, तिची समाजात बदनामी करण्यासाठी पत्नीचे छायाचित्रे अश्लील मजकूरासह टाकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

ही कारवाई सायबरचे पोलिस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील, कैलास कामठे, संदीप वरपे, रविंद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश भोईम, सविता जायभाय, लखन पचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांनी केली.