Wednesday, October 5, 2022

Buy now

धक्कादायक : आईला व्हिडिओ कॉलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मुलाची आत्महत्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील शाहुपुरी येथील एका महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गावी गेलेल्या आईला व्हिडिओ कॉल करून दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती शाहुपुरी पोलिसांना देण्यात आली.

याबाबत शाहूपुरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी येथील जिजामाता काॅलनीतील प्रेम लहू पवार (वय -16) हा आपल्या आई- वडिलांसह राहतो. प्रेम याचे मूळ गाव आसनगाव असून आई-वडील काल तिकडे शेतीकामासाठी गेले होते. आज आईचा वाढदिवस असल्याने प्रेमने सकाळी आईला फोन करून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यानं काही वेळाने गळफास घेतला असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या काही जणांच्या लक्षात आली.

प्रेमने गळफास घेतल्याची माहिती काही शेजारील लोकांनी कुटुंबीयांना दिली. गावी गेलेल्या आई- वडिलांना आपल्या एकलुत्या एकाने गळफास घेतल्याची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे. प्रेम हा सातारा येथील एका महाविद्यालयात 11 वीत शिकत होता. त्याचे वडील शिक्षक आहेत. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.