Monday, January 30, 2023

धक्कादायक! मुंबईत डाॅक्टरकडून कोरोनाबाधित रुग्णाचा विनयभंग

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो आहे.कोरोनाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अगदी अग्रभागी उभे राहून लढा देत आहेत. ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचे कौतुक करीत आहे.अशातच मुंबईतून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरवर कोरोना संसर्गित रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरलाही हा संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एक ४४ वर्षीय कोरोना-संसर्गित व्यक्तीला दक्षिण मुंबई येथील एका नामांकित हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी आरोपी डॉक्टरने पीडितांच्या रूममध्ये प्रवेश केलाआणि तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली.त्यांनतर रुग्णाने अलार्म वाजविला,ज्यामुळे बाकीचे वैद्यकीय कर्मचारी तिथे पोहोचले.या घटनेच्या एकच दिवस आधी तो डॉक्टर रुग्णालयात दाखल झाला होता.यावर रुग्णालय प्रशासनाने त्याला तातडीने नीलंबित केले आणि याविषयी पोलिसांना कळविले.

- Advertisement -

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात येथील ८० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतर हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले होते .मात्र २३ एप्रिल रोजी प्रशासनाने ते पुन्हा उघडण्यास परवानगी दिली.खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाने आपल्या येथील वृद्ध डॉक्टरांना ड्युटीवर येण्यास नकार दिला.आरोपी डॉक्टरने नुकताच मुंबईतील मेडिकल कॉलेजमधून एमडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.जो ३० एप्रिल रोजी नुकताच ड्युटीवर जॉईन झाला होता.

१ मे रोजी ही घटना घडली.आता रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोलिसांनी आयपीसी कलम ३७७,२६९ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा असा संशय आहे की आरोपीही कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाहीये.पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.त्याचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्याला अटक केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.