ओडिसा : वृत्तसंस्था – ओडिसामधील कालाहांडी जिल्ह्यातील गोलामुंडा ब्लॉक या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कुटुंबाला मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral procession) पाण्यातून वाट काढावी लागली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ मन सुन्न करणारा आहे.
चक्क नाल्यातून काढावी लागली अंत्ययात्रा मन सुन्न करणारा Video आला समोर pic.twitter.com/WFmPuDvBgf
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 12, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील लोक अंत्यसंस्कारासाठी (funeral procession) मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. अशा परिस्थितीमध्येही मृतदेह (funeral procession) घेऊन जात आहेत. स्मशानघाट नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे. तसेच पावसाचं पाणी पार्थिवावर पडू नये म्हणून कुटुंबियांनी केळीच्या पानांचा आधार घेतला आहे.
ओडिशा सरकारने 4 वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी (funeral procession) 2 हजार रुपये मिळणार असे आश्वासन देण्यात आले होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या योजनेचे काय झाले ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?