धक्कादायक! घरातून बाहेर काढत कुटुंबाला टोळक्याची मारहाण; दहा जनाविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद | घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यापाऱ्याला बाहेर बोलवत रस्त्यावर दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडे, कमरेच्या बेल्ट ने फिल्मीस्टाईल मारहाण केली. तर भांडण सोडविणाऱ्या व्यापाऱ्यांची पत्नी आणि मुलीला देखील मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील रेणुकानगर भागात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात दहा जनावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश रामधन राठोड वय- 44 (रा.रेणुकांनगर, गारखेडा) असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्रीच्या सुमारास राठोड हे घरात पत्नी, मुलगीसह टीव्ही पाहत असताना आरोपी संदीप, मारुती राठोड व इतर 7 ते 8 जण राठोड यांच्या घरी आले व त्यांना आवाज देऊन बाहेर बोलाविले. दरवाजा उघडून बाहेर येताच आरोपी संदीपने राठोड यांनी कॉलर धरून ओढत त्यांना गल्लीत रस्त्यावर आणले व लाकडी दांडा आणि कमरेच्या बेल्टने सर्व आरोपीनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड एकूण राठोड यांच्या पत्नी आणि मुलगी बाहेर आल्या व का मारतात म्हणून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. व चाकू काढत जीवे मारण्याची धमकीदेत तेथून निघून गेले.

आरोपी हे दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीत म्हंटले असून हा वाद पैशाच्या देवाण-घेवणी वरून घडला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साह्ययक निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.