हादरविणारी घटना : सातवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर, अल्पवयीन चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माण तालुक्यातील सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन चुलत भाऊ आणि एकावर दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत असून ती सात महिन्याची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे.

यामधील धक्कादायक प्रकार म्हणजे अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या चुलत भावाचा देखील समावेश असून दुसरा संशयितांचे 19 वय आहे.
मुलीच्या आईने दोघांवर दहिवडी पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन चुलत भावासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.