Sunday, March 26, 2023

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाकडून मृत कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. पेशंट सापडलेल्या परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाला असून आपल्या सुरक्षेची कशी काळजी घ्यावी याच्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. परंतु आपल्यालाही कोरोना झाला आहे काय? आता आपले काही खरे नाही.. अशी भीती झाल्याने, मानसिक खच्चीकरण झालेल्या विवाहितेने जवळच असलेल्या गणेश तलाव येथे आत्महत्या केली.

- Advertisement -

लक्ष्मी अनंता बगाडे वय 45 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रविवारी पहाटे प्रात:विधी साठी त्या घराबाहेर गेल्या होत्या. त्यानंतर पाण्यात मृतदेह पाहून नागरिकांनी सदरची माहिती दिली. पोलीस पथक, नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यांचे पश्चात पती, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

शनिवारपासून त्यांची मानसिक स्थिती नीट नव्हती, त्यामुळे त्यांनी 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या महिसगाव या माहेरी जाण्यासाठी चालतच प्रवास सुरू केला होता, दरम्यान त्यांना खांडविजवळ नातेवाईकांनी पाहून समजूत काढून घरी आणले होते. परंतू रविवारी लवकर उठून त्या घराबाहेर पडल्या व सदरची दुर्दैवी घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.