धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे आज सकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. रुपाली खोत असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे हर दाखल झाले. आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून एका विवाहित तरुणीची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याची घटना शिराळा तालुक्यातील देववाडी येथे घडली. रुपाली खोत असे ३२ वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. निवास खोत असे संशयित आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. काल, गुरुवारी संध्याकाळी ही विविहिता बेपत्ता झाली होती. आज, सकाळी या तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. गावकर्‍यांना मृतदेह दिसताच खळबळ उडाली.

विहारी कडेला महिलेला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णाा पिंगळे हे फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांकडून या प्रकरणी माहिती घेतली. संशयित निवास खोत हा नेहमी महिलांसमोर उघडे फिरायचा अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like