नवी दिल्ली । दक्षिण सिनेमाचा मेगास्टार थलापथी विजय अनेकदा त्याच्या चित्रपट आणि अभिनयाबद्दल चर्चेत असतो. पण, यावेळी तो त्याच्या कुठल्याही चित्रपटामुळे नव्हे तर त्याच्या कौटुंबिक मतभेदांमुळे चर्चेत आहे. त्याने पालकांविरोधात 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या अभिनेत्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पालकांवर गुन्हा का दाखल करण्यात आला?
मीडिया रिपोर्टनुसार, थालापथी विजयने 11 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. वास्तविक, विजयचे वडील आणि दिग्दर्शक एस. के. चंद्रशेखर यांनी काही काळापूर्वी एक राजकीय पक्ष सुरू केला होता, ज्याचे नाव ‘ऑल इंडिया थलापथी विजय मक्कल इयक्ककम’ आहे. असे सांगितले जात आहे की, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अभिनेत्याच्या वडिलांचे नाव निवडणूक पक्षात सरचिटणीस म्हणून नोंदवले गेले आहे. तर त्याची आई शोभा चंद्रशेखर या कोषाध्यक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगितले जात आहे की, या प्रकरणाची सुनावणी 27 सप्टेंबरला होईल.
“माझा पक्षाशी कोणताही संबंध नाही” – विजय
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेता विजयने आपले वक्तव्य जारी करताना म्हंटले होते की,”पक्षाशी माझा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध नाही.” यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांनाही आवाहन केले की,”हा फक्त एक पक्ष आहे फक्त त्याच्या नावासाठी यामध्ये सामील होऊ नका. जर कोणी त्याचे नाव, फोटो किंवा फॅन क्लब यासाठी वापरत असेल तर तो त्याच्याविरुद्ध आवश्यक पावले उचलेल.”
थलपथी विजय दक्षिणे कडील मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. लोकं त्याला त्याच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखतात. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याचे फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. या अभिनेत्याने 1992 मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट ‘नलय थेरपू’ होता. विजय जेव्हा या चित्रपटाचा भाग बनला, तेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता. यानंतर त्याने सिनेमा जगताला एकापेक्षा जास्त चित्रपट दिले.