Saturday, February 4, 2023

धक्कादायक ! डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन, तिच्याच आई-वडिलांना पाठवला अश्लील व्हिडिओ

- Advertisement -

औरंगाबाद – आपल्या वर्ग मैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत काढलेले आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी पीडित तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात या विषयी तक्रार दाखल केल्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अजहर अश्फाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असून त्यास ओसामा खान व हमजा पठाण यांनी मदत केली होती सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित तरुणीचे बीडचे शिक्षण झाले असून ती एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करते.

याविषयी अधिक माहिती अशी की, वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची तिचा नातेवाईक अजहर शेख यांच्याशी त्याची आई व बहिणीची ओळख करून दिली् तेव्हा त्याने एका विमान कंपनीत मुंबई येथे नोकरीला असल्याचे सांगितले. त्याने पहिल्याच भेटीत तू आवडत असून, आपण लग्न करू अशी गळ घातली. लवकरच सौदी एअरलाइन्स मध्ये नोकरी लागणार असून आपण जेद्दा येथे स्थायिक होऊ असे आमिष दाखवले. यातूनच त्यांची मैत्री वाढत गेली.

- Advertisement -

यानंतर, आरोपीने 21 नोव्हेंबर 2020 रोजी औरंगाबादेत एका हॉटेलवर भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार केला. त्यावेळी खोलीत तिचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने 9, 10 जानेवारी, तसेच 1 व 22 फेब्रुवारी 2021 रोजी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर तिचे अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून 10 लाख रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून तरुणावर बलात्कार, खंडणीसह इतर गुन्हे दाखल केले आहेत.