हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाटण तालुक्यातील मोरेवाडी ( कुठरे) येथील एका कुटुंबातील पुरुष आणि वृद्ध आईचा अर्धवट जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तीचे नाव सचिन लोकरे( वय 38) व वृद्ध आई कमल लोकरे ( वय 61 ) आहे. दोघांचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ढेबेवाडी पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मयत सचिन ज्ञानदेव लोकरे व सौ.कमल ज्ञानदेव लोकरे हे मोरेवाडी येथिल लोकरेवस्ती येथे राहत होते. सचिनचे वडील ज्ञानदेव लोकरे हे आजारी असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते सचिनचा भाऊ नितीन हा त्यांच्याबरोबर कराड येथे होता.त्यामुळे सचिन व आई कमल हे दोघेजण घरी होते.
आज सोमवार दि.8 मार्च रोजी त्यांच्या घराचे दार उघडले गेले नाही व घरातून धूर निघायला लागला. लोकांनी हाका मारल्या पण आतून काही आवाज आला नाही,यामुळे याची खबर पोलिस पाटील सविता बाजीराव सपकाळ यांनी ढेबेवाडी पोलीसांना दिली यानंतर दार उघडण्यात आले असता अर्धवट जळलेल्या व मृत अवस्थेत दोघेही दिसून आले, ढेबेवाडी पोलिसांनी हे मृतदेह कराड येथे शवविच्छेदनासाठी नेले आहेत.
या घटनेचे नेमके कारण काय याचा तपास चालू असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोकराव थोरात यांनी भेट दिली.घटना पाहण्यासाठी परिसरातील लोक येत होते व हळहळ व्यक्त करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’