Wednesday, October 5, 2022

Buy now

धक्कादायक ! आईनेच दिली पोटच्या मुलीवर अत्याचाराची सूट

औरंगाबाद – आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची खुली सूट प्रियकराला देणार्‍या आईला आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचा तक्रारीवरुन पुंडलिक नगर पोलिसांनी काल ही कारवाई केली. या प्रकरणी सोहम गाडे (45) व त्याच्या सोबत अनैतिक संबंध असलेली महिला (36) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या महिलेचा अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली आहे.

पती सोबत पटत नसल्याने सदर विवाहित महिला अल्पवयीन मुलगी व मुलासह गारखेडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. सतरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अंदाजे मागील सहा वर्षापासून सोहम गाडे हा आईला भेटण्यासाठी नेहमी घरी येतो. अनेक वेळेस तो रात्रभर देखील आमच्या घरीच थांबतो. ऑगस्ट 2020 मध्ये आईने माझ्या भावाला मामाकडे पाठवून दिले. त्या दिवशी रात्रीच्या वेळी सोहम गाडे हा घरी आला. त्याची व आईचे काहीतरी बोलणे झाले त्यानंतर सोहम गाडी माझ्या जवळ आला व बळजबरी करू लागला. मी आईकडे तक्रार केली तेव्हां आईनेच त्याला संमती दिली. माझा विरोध कमी पडला त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली तेव्हा आई देखील तिथेच होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोन वेळेस त्याने असेच केले. आई व सोहमण्या त्रासाला वैतागून मी घरातून निघून गेले. परंतु आसरा न भेटल्याने मी पुन्हा घरी आले, असे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवा गायकवाड यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.