धक्कादायक..! कब्रस्तानमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला

महानगरपालिका हद्दीतील घटना

औरंगाबाद | येथील महानगरपालिका मुख्यालयाच्या हद्दीत असलेल्या कब्रस्तानमध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या तरुणाचा भोसकून निर्घृण खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तरूणाचा एक हात तुटलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात रात्रीची संचारबंदी असताना, ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनही हादरले आहे. यामागचे नेमके कारण, मात्र अद्याप समजू शकले नाही. या तरुणास बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस व विविध पथके घटनस्थळी दाखल झाली आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून पंचनामा झाल्यानंतरच याबाबतची माहिती समोर येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like