धक्कादायक !!! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा लागली आग, संपूर्ण शोरूमच जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ही आग एक-दोन स्कूटरला नव्हे तर संपूर्ण शोरूमलाच लागली आहे. सदर प्रकरण हे तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूमधील एका ओकिनावा ऑटोटेक शोरूमला आग लागली.

IANS या वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूमधील इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ओकिनावा ऑटोटेकच्या शोरूमला अचानक आग लागली. या घटनेत संपूर्ण शोरूम जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र ही आग स्कुटर मधून लागल्याचे सांगण्यात येत आहे. स्कूटरमधून निघणाऱ्या ठिणग्यांनी काही सेकंदात संपूर्ण शोरूमला आगीच्या जाळ्यात ओढले.

Okinawa Electric Scooter Fire incident News, Electric Scooter Fire News, Okinawa Autotech Dealership Fire,

ओकिनावाने रिकॉल केले स्कूटर्स
ओकिनावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची ही चौथी घटना आहे. मात्र, या घटनेपूर्वी ओकिनावाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ओकिनावा ऑटोटेकने याबाबत म्हंटले की,”हे रिकॉल त्यांच्या टेस्ट कॅम्पचा एक भाग आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांशी संपर्क सुरू केला आहे.” कंपनीचे म्हणणे आहे की, लूज कनेक्टर किंवा कोणत्याही कमतरतेसाठी बॅटरी तपासल्या जातील. ग्राहकांना संपूर्ण भारतातील कोणत्याही ओकिनावा डीलरशिपवर ही सर्व्हिस फ्री मध्ये मिळू शकेल.

ओकिनावाने दोनच दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी आपल्या Praise Pro’ स्कूटर्सच्या 3,215 युनिट्स परत मागवण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले आहे की, बॅटरीशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते Praise Pro’ इलेक्ट्रिक स्कूटर्स परत मागवत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने आपल्या वाहनांसाठी रिकॉल जारी करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी ओकिनावाच्या तीन इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. या घटनांमध्ये दोन जण जखमीही झाले आहेत. ओकिनावा व्यतिरिक्त ओला इलेक्ट्रिक, प्युअर ईव्ही आणि जितेंद्र ईव्हीच्या स्कूटरमध्येही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Comment