धक्कादायक : तीन वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबाद । जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अवघ्या २९ दिवस आणि ६ महिन्याच्या बाळांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान गुरुवारी आणखी एका चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तीन वर्षाच्या या मुलीवर सिल्लोडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तिला बुधवारी (दि.३१) घाटीत दाखल करण्यात आले होते, गुरुवारी पहाटे पाच वाजता तिचा मृत्यू झाला.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील ३ वर्षांच्या या चिमुकलीला ॲनेमियाचा आजार होता. मागील दहा दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल तिला घाटीत दाखल करण्यात आले असता, तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिच्या आईचीसुद्धा तपासणी केली असता, आईदेखील पॉझिटिव्ह आल्याचे घाटीच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा मोठा संसर्ग वाढला लागला आहे. लोकांनी काळजी घेणे गरजेचे असून नियमाचे पालन करावे, असे प्रशासन सांगत आहे.

You might also like