धक्कादायक! अज्ञाताने चक्क एकरातील उपटला कापूस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी | तालुक्यातील समसापुर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक एकर वरील कापसाची झाडे एका अज्ञाताने उपटून टाकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, परभणी तालुक्यातील समसापुर येथील शेतकरी पद्माकर शेषराव चोपडे यांच्या समसापुर शिवारातील गट नंबर – 196 मध्ये कापसाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीलाच कापसाची लागवड केल्यामुळे हे पीक अतिशय जोमात आणि होते. परंतु शनिवारी एका अज्ञाताने एक एकरवरील पूर्ण कापूस उपटून टाकल्याने शेतकऱ्यांचे अंदाचे 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment