Monday, February 6, 2023

मौलाना आझाद चौकातील दुकानाला आग; आगीत 1 दुचाकी जळून खाक

- Advertisement -

औरंगाबाद : येथील मौलाना आझाद चौकातील आचल ट्रेडिंग या दुकानाला आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये एक दुचाकी जागीच जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

दुकानाला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि त्यांना आग विझविण्यात यश आले. या आगीत दुकानाचे किती नुकसान झाले हे अद्याप समजले नाही.

- Advertisement -

दरम्यान, ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या दुकानदारांनी आपले सामान वाचवण्यासाठी धावपळ केली. ही आग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी केली होती. तेव्हा सिडको पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी बघ्यांची गर्दी हटवली.