शॉर्टसर्किटने लागली भीषण आग : आगीमध्ये दुचाकीसह खोक्यातील साहित्य जळून झाले खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

शहरात आगीच्या घटनांत वाढ होत आहे. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय जवळ असणाऱ्या खोक्या जवळ शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या आगीमध्ये एका खोक्यामध्ये असणारे साहित्य आणि एक मोटारसायकल जळून खाक झाले. नागरिकांनी याची माहिती स्थानिक नगरसेवकांना देताच नगरसेवकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये खोक्याचे मोठे नुकसान झालेलं आहे.

हाती मिळालेल्या माहितीनुसार , दुकाना शेजारी सुका कचरा टाकला जायचा. रात्री खोकी धारक हे आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. काल रात्री ११ वाजण्याच सुमारास शॉर्ट सर्किट ने ठिणग्या पडून सुक्या कचऱ्याला आग लागली. काचाऱ्या शेजारीच महंमद कैफ हे लाकडी दुकान आहे. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल आणि महंमद कैफ यांच्या खोक्यालाही आग लागली. या दुकानामध्ये गाड्यांच्या बॉडीचे काम केले जात असे. त्यासाठी लागणारा गॅस सिलेंडर सुद्धा या खोक्यात होता. त्या सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण आगीमध्ये खोक्यातील सर्व साहित्य आणि एक दुचाकी जळून खाक झाली.

आग लागल्याचं स्थानिक नागरिकांना निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांना दिली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची कल्पना दिली. अग्निशमन दलाच्या एक बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या परिसरात अनेक लाकडांची खोकी आहेत, अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा अन्य खोकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.

Leave a Comment