Monday, February 6, 2023

गोकुळ निवडणूक झाल्यावर लॉकडाऊनचा निर्णय घेणार्‍या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय – महाडिक

- Advertisement -

कोल्हापूर : वाढती कोरोनारुग्णसंख्या लक्षात घेत कोहापूर जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली असून गोकुळ निवडणूक झाल्यानंतर लगेच लॉकडाऊन लावणे यावरून पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गोकुळ निवडणूक झाल्यावर लॉकडाऊनचा निर्णय घेणार्‍या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय अशी टीका शौमित्र अमल महाडिक यांनी केली आहे.

कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय असं म्हणत शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टिका केलीय. तेव्हा माणसं मरत नव्हती का? असा सवाल करत कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही असं महाडिक म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी गोकुळचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सत्ताधारी महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या गटाने निवडणुकीत बाजी मारली असून गोकुलमध्ये सत्तांतर झाले आहे. मात्र निवडणूक निकाल जाहीर होताच लॉकडाऊनची घोषणा झाल्याने विरोधकांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधत टीका केली आहे. आता लॉकडाउनच निर्णय बदलण्यात आला असून जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.