हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shravan 2025 । उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण हा पवित्र महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. यंदा २५ जुलै ते २३ ऑगस्ट या काळात श्रावण महिना आहे. श्रावण म्हंटल कि पहिल्यांदा आपल्या डोक्यात हे येत कि या महिन्यात मटण, चिकन, अंडी, मासे यांसारखा मांसाहार करायचा नाही. जवळपास ९० टक्के हिंदू श्रावणात मांसाहार करत नाही. उलट या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणात उपवास, रुद्राभिषेक, पूजा व सात्विक जीवन पद्धतीचे पालन केले जाते. परंतु श्रावणात मांसाहार न करण्याचे फक्त धार्मिक कारणच आहे असे अजिबात नाही, तर यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात कि श्रावण महिन्यात मांसाहार का करत नाहीत??
धार्मिक कारण –
श्रावण हा महिना (Shravan 2025) देवशिवासोबत तंतोतंत जोडलेला आहे. हा एक शुभ महिना मानला जातो. जस आम्ही आधीच सांगितलं कि, श्रावण महिना हा श्रावण हा पवित्र महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. त्यामुळे भक्त पारंपारिकपणे उपवास करतात, मंदिरांना भेट देतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात. शंभो महादेवाला ‘पशुपतिनाथ’देखील म्हटले जाते म्हणजेच काय तरसंपूर्ण जीवजंतूंचा पालनहार….. त्यामुळे या महिन्यात शंकराची पूजा करताना जीव जपायचे म्हणून मांसाहार टाळला जातो. तसेच पूजापाठ करताना मांसाहार चालत नाही असेही हिंदू धर्मात मानले जाते.
वैज्ञानिक कारण- Shravan 2025
विज्ञानानुसार, श्रावण महिन्यात सूर्यप्रकाश खुप कमी वेळ असतो. पावसाळी वातावरणामुळे सगळीकडे गारवा आणि आद्रता वाढते. त्यामुळे आपली पचनक्रिया कमजोर होते. मांमांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते, जे सामान्यपेक्षा पचणे अधिक कठीण होते. अशावेळी शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. अपचन, गॅस आणि इतर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे श्रावण महिन्यात (Shravan 2025) मांसाहार करणे योग्य नसल्याचं बोललं जाते.
पावसाळ्यात नद्या आणि तलावांसारखे पाण्याचे स्रोत दूषित होतात. परिणामी या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात . दुसरीकडे, श्रावण महिना माशांच्या प्रजनन काळात येतो. या काळात, माशांमध्ये जैविक बदल होतात ज्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर आणि पौष्टिकतेवर परिणाम होतो. ते परजीवी आणि संसर्गांना देखील अधिक संवेदनशील असतात. त्यांच्या सेवनाद्वारे ते मानवांमध्ये पसरू शकतात. म्हणूनच, या काळात मासे खाणे अयोग्य मानले जाते.




