श्रेयश अय्यरची नारायण स्टाईल बॉलिंग; Video पाहून म्हणाल क्या बात है!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुची बाबू टूर्नामेंटमध्ये TNCA XI विरुद्ध मुंबईच्या श्रेयश अय्यरने (Shreyas Iyer) नारायण स्टाईल (Sunil Narine Style Bowling) गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे सुनील नारायण गोलंदाजी करतो अगदी त्याचप्रमाणे हुबेहूब ऍक्शनने गोलंदाजी करत श्रेयश अय्यरने सर्वानाच आश्चर्यचकित केलं. भलेही श्रेयसला विकेट घेण्यात यश मिळालं नसेल परंतु त्यांची बॉलिंग स्टाईल चर्चेत आली. सोशल मीडियावर श्रेयशच्या या बॉलिंग ऍक्शनचा विडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यानी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

खरं तर जेव्हापासून गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे तेव्हापासून टीम इंडिया मधील फलंदाज सुद्धा गोलंदाजी करताना आपल्या पाहायला मिळाले. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगने गोलंदाजी करत आपले हात साफ केले. त्याचप्रमाणे आता बुची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबईकर श्रेयश अय्यरनेही गोलंदाजी करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. खास बाब म्हणजे श्रेयशची गोलंदाजी स्टाईल सुनील नारायणचाय स्टाईल सारखी होती. श्रेयश अय्यर आणि सुनील नारायण अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएल खेळतात. त्यामुळे नारायणनेच तर अय्यरला आपली स्टाईल शिकवली नाही का असं प्रश्न पडतोय.

TNCA XI विरुद्धच्या पहिल्या डावात मुंबईचा संघ विकेट मिळवण्यासाठी झगडत होता. त्यावेळी श्रेयश अय्यर गोलंदाजीला आलो. मात्र तो श्रेयश अय्यर आहे कि सुनील नारायण असा प्रश्न पडला, कारण नारायण जसा पाठीमागे हात ठेवतो, तसाच अय्यरही हात मागे ठेवताना दिसला, जेणेकरून फलंदाजाला तो कोणता चेंडू टाकणार आहे हे कळू नये. नारायणची हुबेहूब नक्कल अय्यरला जमली. श्रेयश अय्यरने हे एकमेव षटक टाकलं, यामध्ये त्याने 7 धावा दिल्या.