जळगाव प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. याचसोबत शुक्रवारी तापी-पूर्णा संगमावर चांगदेव महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. आज पहाटेपासून भाविकांची गर्दी चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सकाळपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले यात प्रामुख्याने गजानन महाराज संस्थान शेगाव, मुक्ताई दिंडी, गोमाजी महाराज तसेच लहान मोठ्या दिड्यांचे आगमन दिवसभर सुरू होते. मंदिर परिसरात यात्रे निमित्ताने पूजेच्या साहित्य, मिठाई, खेळणी, संसार उपयोगी सामानाच्या दुकानांनी बाजार चांगलाच फुलाला आहे.
दरम्यान, तापी पूर्णाच्या नयनरम्य संगमावर भाविक मोठ्या संख्येने नौकानयनाचा आनंद घेतांना दिसले. चालक-मालक संघटनेच्या वतीने २० बोट भाविकांना संगम दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.खबरदारी म्ह्णून चालक-मालक नावाडी संघटनेचे सदस्य तापी-पूर्णा संगमावर दिवसभर सतर्क होते. ग्रामपंचायत मार्फत यात्रेत विविध सुविधा पुरवण्यात आल्या. तर पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, बससेवा, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कर्मचारी वर्ग हजर होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.