हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shri Kshetra Kanifnath) महाराष्ट्रात अनेक मंदिरं आहेत. ज्यांपैकी कित्येक मंदिरे प्राचीन आणि पुरातन आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिट्य, खासियत आहे. प्रत्येक मंदिराची एक गोष्ट, कथा किंवा आख्यायिका आहे. अशाच एका प्राचीन, अद्भुत आणि मनाला शांतता देणाऱ्या एका मंदिराची आज आपण माहिती घेणार आहोत. सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला असणाऱ्या कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी की, गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल तर सरपटत जावे लागते. अशा या अद्भुत मंदिराविषयी अधिक जाणून घेऊया.
श्री क्षेत्र कानिफनाथ गड (Shri Kshetra Kanifnath)
सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिम दिशेला बोपगांव आहे. या ठिकाणी कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे मंदिर स्थित आहे. श्री कानिफनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायातील नऊ शिक्षकांपैकी एक होते. हिंदू मान्यतेनुसार, ऋषी दत्तात्रेय, पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे अवतार त्यांचे पहिले शिक्षक आहेत. त्यामुळे हे मंदिर कानिफनाथ यांना समर्पित आहे. या मंदिरात कानिफनाथांच्या दर्शनासाठी अनेक भाविक लांबून प्रवास करून येत असतात.
शिल्पकलेचा उत्तम नमुना
श्री क्षेत्र कानिफनाथ हे मंदिर अत्यंत प्राचीन असून पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. या मंदिराचा गाभारा प्रचंड मोठा आहे. (Shri Kshetra Kanifnath) कानिफनाथ यांच्या मंदिरातजाण्यासाठी तुम्हाला साधारण २० ते ३० पायर्या चढून वर यावे लागते. हे मंदिर इतर कोणत्याही मंदिरांसारखे भव्य संगरमरावरचे वगैरे नसून एक छोटी गुहा आहे. ज्यामध्ये सरपटत आत शिरावे लागते. अर्थात कानिफनाथांच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे असेल तर तुम्हाला आत सरपटत प्रवेश करावा लागतो.
सरपटत करावा लागतो गाभाऱ्यात प्रवेश
श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिराचा गाभारा अत्यंत मोठा आहे. मात्र, या मंदिरात प्रवेश करण्याचा दरवाजा केवळ १ × १ फुट इतक्या आकाराचा आहे. त्यामुळे कानिफनाथ यांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर सरपटत जाण्याशिवाय मार्ग नाही. यासाठी येथील पुजारी मदत करत. (Shri Kshetra Kanifnath) मंदिरात प्रवेश कसा करायचा यासाठी काही पुजारी युक्ती सांगतात. गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. तसेच बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडावे लागते.
कसे जाल?
श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे जाण्यासाठी पुण्यापासून २ घाट पार करावे लागतात. इथे जायला मगरपट्टा येथून दोन मार्ग आहेत. एकतर सासवडला वरून किंवा मग कोंढवा रोडने या ठिकाणी जात येते. रस्त्याची खात्री होत नसेल तर कुणाला बोपदेव घाट विचारून जात येईल. हा घाट चढून गेल्यावर डावीकडे श्री क्षेत्र कानिफनाथ असा एक मोठा फलक दिसेल आणि मग तो सरळ डोंगराच्या माथ्यावर जाणारा रस्ता आहे. तो धरून जा. (Shri Kshetra Kanifnath) म्हणजे तुम्ही श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे पोहचाल.