अहमदनगर प्रतिनिधी | शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम यांनी नगर शहर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीये. श्रीपाद छिंदम याने बहुजन समाज पार्टी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र तरीही अहमदनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि आता विधानसभा निवडणुकीत श्रीपाद छिंदम याने उडी घेतलीये.
एकीकडे शिवसेनेकडून अनिल राठोड तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप निवडणूक लढवत आहेत. त्यातच आता श्रीपाद छिंदम याने निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.