देशात ८० टक्के लोकसंख्या हिंदू असताना धार्मिक राजकारणाची गरज काय? – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतात हिंदुंची लोकसंख्या 80 टक्के असताना देशात धार्मिक राजकारण करण्याची गरजच काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील धार्मिक राजकारणावर टीका केली.

देशातील शुद्र राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत भारतातील परिस्थिती बदलणार नाही, असं मत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले आहे. देशात जात व धर्मावरून राजकारण सुरु आहे. यामुळे देशाचं विघटन होईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे देश काहीच शिकला नाही. आजही विचारांची गुलामी सुरु असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

.. तेव्हाचं ईडी मागे लागते’
संजय राऊतांना पैसा हा राऊतांकडूनच आला. त्यांच्यात नात्याचे संबंध नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे. तेव्हा संजय राऊत यांनी 55 लाख कशासाठी आलेत, याचा खुलासा करावा. म्हणजे संजय राऊत मोकळे होतील, असे आंबेडकर यांनी म्हटले.नेते हे व्यापारी आणि राजकर्ते एकाच वेळी झाले की ईडी मागे लागते. राजकारण करताना चारित्र्य मोकळे हवे. ईडीने रेड केली म्हणजे तुम्ही टॅक्सेस भरलेले नाहीत. इथल्या व्यापारी कारखानदारांच्या मागेही ईडी लागली आहे. व्यापारी म्हणून काम करताय तर राजकारणाचं शिल्ड घेऊ नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

‘राज्यातील राजकीय पक्षांनी स्वबळावर लढावे’
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. कोणीही एकमेकांशी युती करु नये. प्रत्येक पक्षाने आपली संघटना टिकवावी, असे माझे मत आहे. युतीच्या राजकारणात पक्ष लयास जातो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment