Siddhant Shirsat : विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध; शिरसाठांवर गंभीर आरोप

Siddhant Shirsat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Siddhant Shirsat । राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. तसेच आपण त्यांच्याशी बौद्ध पद्धतीने लग्न केल्याचा दावाही सदर महिलेने केला आहे. मात्र लग्नानंतर सिद्धांत यांचे वर्तन बदलले असल्याच तिने म्हंटल. याप्रकरणी सिद्धांत शिरसाठ यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

फ्लॅटवरच शारीरिक संबंध- Siddhant Shirsat

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट(Siddhant Shirsat) यांच्याशी ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. चेंबूर येथील एका फ्लॅटवरच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. यानंतर सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला. अखेर सदर विवाहित महिलेने सिद्धांत याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन लग्न केलं. मात्र लग्नानंतर सिद्धांतचे वर्तन बदललं.

सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. तसेच तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करेन” अशा धमक्याही दिल्या. यानंतर संबंधित महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावून सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती. मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आपण यापूर्वी 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, मात्र सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाठ हे महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असल्याने पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबलं असा आरोपही महिलेने सदर नोटिशीत केला आहे. त्यामुळे संजय शिरसाठ यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.