सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘त्या’ चिमणीचे पाडकाम अधिवेशनानंतरच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याच्या कामाला अजून देखील मुहूर्त मिळत नसल्याचे समोर आले आहे. या कारखाण्याची चिमणी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विमानतळासाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे यावर बरेच वादविवाद तसेच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. विमानतळांच्या निकषानुसार विमानतळाच्या दोन्ही बाजूने विमानाचे लँडिंग, टेकऑफ होणे गरजेचे असते. मात्र चिमणी असल्याकारणाने सोलापूर विमानतळाच्या एकाच बाजूने विमानाचे लँडिंग टेक-ऑफ होत आहे. चिमणीच्या बाजूने टेक ऑफ करण्याचा प्रयत्न केला तर चिमणीमुळे विमानाचा अपघात होऊ शकतो. कारण ते धावपट्टीच्या मार्गावरच आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून विमाने एकाच दिशेने उतरत उड्डाण घेत आहेत. छोट्या विमानांना चिमणीचा अडसर नसला तरीही एटीआर -७० सारख्या मोठ्या विमानांना याचा फटका बसत आहे.

दरम्यान आता सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर होणार आहे़. नगरविकास खात्याने चिमणी पाडकामाबाबत अहवाल मागविल्यामुळे चिमणीचे पाडकाम लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे.  चिमणी पाडकामा संदर्भातील अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाने मागितला असून तो त्यांना देण्यात आला आहे. नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल़. तसेच कॉन्ट्रक्टरच्या दिरंगाईमुळे चिमणी पाडकामाला वेळ लागत आहे. अधिवेशन कालावधीत चिमणी पाडकामाचे काम होणार नाही, अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल अशी माहिती मिळत आहे.

Leave a Comment