Side Effect Of Tea | भारतामध्ये बहुतांश लोक एक सकाळी उठल्यानंतर चहा पितात. आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, सगळ्याच घरांमध्ये सकाळी चहा बनवला जातो. अनेक लोकांची दिवसाची सुरुवात ही चहा पिल्याशिवाय होत नाही. चहा पिल्याने फ्रेश वाटते. पण सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी लगेच चहा पीत असाल, तर ही सवय चांगली नाही. यामुळे आपल्या आरोग्याला अनेक तोटे होतात. रिकाम्या पोटी चहा पिल्याने (Side Effect Of Tea) आता नेमके कोणते तोटे होतात? हे आपण जाणून घेऊया.
पचनाशी संबंधित समस्या | Side Effect Of Tea
तुम्ही तर सकाळी रिकाम्या पोटी चहा पीत असाल, तर तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते, ज्यामुळे पोटातील ऍसिडिटी वाढते आणि पोटात जळजळ, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.
दातांच्या समस्या
चहामध्ये टॅनिन आणि ऍसिड असते. ज्यामुळे आपले दातांना नुकसान पोहोचते. यामुळे आपल्या दातांवर पिवळे डाग पडणे, कॅविटीची समस्या उद्भवते.
कॅफिनची सवय | Side Effect Of Tea
सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही चहा पीत असाल, तर तुम्हाला कॅफिनची सवय लागते. कॅफिन हे एक उत्तेजक आहे. त्यामुळे आपले शरीर एकदम फ्रेश होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या जाग होण्याच्या चक्रात अडथळा होतो.
डिहायड्रेशन
सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. तुम्ही जर रात्रभर उपवास केला, तर शरीरामध्ये सकाळी डीहायड्रेशन होते. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा पीत असेल तर शरीराला ते हायड्रोजन मिळत नाही. आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.