अमिताभ बच्चन यांची नातं नव्याला डेट करतो सिद्धांत चतुर्वेदी? चाहत्यांनी ‘अशी’ पकडली चोरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन अमिताभ बच्चन यांची नात नव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. नव्या नवेली नंदा हे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या नव्याचं नाव गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत चर्चेत आहे.

नव्या नवेलीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती एका दुकानाजवळ उभी आहे. नव्याचा हा फोटो सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. या फोटोवर सिद्धांत चतुर्वेदी यांनी केलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच दोघांच्या लिंकअपचीही चर्चा सुरू झाली आहे.

https://www.instagram.com/p/CcfBQEivRK7/?utm_source=ig_web_copy_link

चाहते घेतायत याची मजा

नव्या नवेलीच्या फोटोवर सिद्धांत चतुर्वेदीने कमेंटमध्ये एक चिकन इमोजी शेअर केला आहे. इमोजीमध्ये अंड्यातून कोंबडा बाहेर येताना दिसत आहे. सिद्धांतची ही प्रतिक्रिया जबरदस्त चर्चेत आहे. तसे, नवीन आणि सिद्धांतच्या लिंकअपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. एका मुलाखतीदरम्यान सिद्धांत चतुर्वेदीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. सिद्धांतने सांगितले होते की, नव्या नावेलीसोबत माझे एकच आणि एकमेव मैत्रीचे नाते आहे.

नव्याचे नाव मीझानशीही जोडले गेले आहे

सिद्धांत चतुर्वेदीपूर्वी नव्याचे नाव जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरीसोबतही जोडले गेले आहे. खरं तर, नव्या आणि मीजानला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. यानंतर फेन्समध्ये त्यांच्या अफेअरबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या.

https://www.instagram.com/p/CaNSJvLM72u/?utm_source=ig_web_copy_link

लवकरच सिद्धांत चतुर्वेदीचा फोन बूथ हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि ईशान खट्टर देखील दिसणार आहेत. याशिवाय सिद्धांत खो खे हम कहाँ है हा आणखी एक चित्रपट करत आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो आणि अनन्या पांडे एकत्र पाहायला मिळणार आहेत.

https://www.instagram.com/p/CGMWE_fMgsz/?utm_source=ig_web_copy_link

 

Leave a Comment