सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. या काळात WhatsApp,Telegram साखर अनेक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप लाँच करण्यात आले आहेत. याद्वारे अनेक प्रकारची कामे देखील सुलभ झाली आहेत. आता नुकतेच टेलिग्रामकडून आपल्या प्लॅटफॉर्मवर एक मोठे अपडेट जारी केले गेले आहे. ज्यामध्ये ऑटो-डिलीट चॅट, विषय 2.0, स्पॅम मेसेज फिल्टर करण्यासाठी आक्रमक मोड, टेम्पररी QR कोड, iOS वर इमोजी सर्च, नवीन कस्टम इमोजी आणि इतर इंटरॅक्टिव्ह इमोजी सारखे अनेक मनोरंजक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय टेलिग्रामने आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे युझर्सना प्लॅटफॉर्मवर एक्सेस मिळवणे सोपे जाते.

Telegram faces outage, stops working for many

खरं तर, कंपनीने ‘नो-सिम साइन-इन’ एक नावाचे फिचर लाँच केले आहे. त्याअंतर्गत युझर्सना सिम कार्डशिवाय आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबर शिवाय टेलिग्राम खाते ठेवण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे, यामध्ये Telegram अनोळखी व्यक्तींना युझर्सचा मोबाइल नंबर दाखवत नाही, ज्यामुळे ते लोकांशी कनेक्ट होण्यासाठी सर्वात सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनते. या नो-सिम साइन-इन सुविधेमुळे आता सिम कार्ड बाळगण्याची गरज दूर करून मोबाइल नंबरची प्रायव्हसी चांगलीच वाढते.

45 million Iranians use Telegram despite ban

हे लक्षात घ्या कि, यामध्ये युझर्सना नवीन आणि निनावी फोन नंबर देण्यासाठी या फिचरद्वारे फ्रॅगमेंट ब्लॉकचेन वापरले जाते. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या फीचर्स बाबत स्पष्टीकरण देताना Telegram ने लिहिले की, आता युझर्सना सिमकार्डशिवाय टेलिग्राम खाते तयार करता येईल. तसेच ब्लॉकचेनवर चालणारे निनावी नंबर वापरून लॉग इन करता येईल. त्यामुळे जर एखाद्या युझरला सिम कार्ड किंवा मोबाईल नंबर न वापरता टेलिग्राम खाते तयार करायचे असेल तर आता ते सहजपणे तयार करता येऊ शकेल.

 

Telegram gets new features: Download Manager, updated Attachment Menu,  Broadcast Tools and more | The Financial Express

सिम कार्डशिवाय Telegram वर अशा प्रकारे करा साइन अप

स्टेप 1- सर्वांत आधी आपल्या डिव्हाइसवर टेलिग्रामच्या अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा.
स्टेप 2- आता टेलिग्राम अ‍ॅप उघडा.
स्टेप 3- Get Started बटणावर टॅप करा.
स्टेप 4- फ्रॅगमेंट म्हणून केलेला ब्लॉकचेन-बेस्ड फोन नंबर एंटर करा.
स्टेप 5- आपले अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी फ्रॅगमेंट-बेस्ड नंबरवर मिळालेला OTP एंटर करा.
स्टेप 6- नंबर व्हॅलिड केल्यानंतर सिम कार्डशिवाय टेलिग्राम वापरू शकता.

လူသိနည်းတဲ့ Telegram ရဲ့ လုပ်ဆောင်ချက် (၄)ခု

अशा प्रकारे खरेदी करा फ्रॅगमेंट फोन नंबर

स्टेप 1- सर्वांत आधी Fragment वर जा.
स्टेप 2- यानंतर सर्च बारमध्ये वापरायचा असलेला नंबर जोडा.
स्टेप 3- अनलॉक नंबरच्या खाली असलेल्या पर्यायावर टॅप करा.
स्टेप 4- यानंतर आपल्या निवडीची पुष्टी करा.
स्टेप 5- आता फोनचा कॅमेरा किंवा टोन कीपरने QR कोड स्कॅन करा.
स्टेप 6- Tonekeeper खाते डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि लॉग इन करा.
स्टेप 7- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करा. Telegram

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://telegram.org/

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये