Sim Card Recharge | सध्या बाजारात अनेक नवीन सिम कार्ड विकत मिळतात. आणि त्यावर अनेक ऑफर्स देखील असतात. त्यामुळे अनेक व्यक्ती नवीन सिम कार्ड घेतात. परंतु आता एक नवीन नियम लागू झाला आहे की, जर तुम्ही नवीन सिम कार्ड विकत घेतले आणि ते काही दिवसांसाठी त्याला रिचार्ज केला नाही तर ते सिम कार्ड कायमचे बंद पडू शकते.
आज-काल अनेक अशी लोकं आहे. जे त्यांचा एक पर्सनल नंबर आणि आणखी एक नंबर वापरतात. परंतु अशावेळी ते कोणत्यातरी एकाच सिम कार्डला रिचार्ज करतात. परंतु आता असे चालणार नाही. तुम्हाला त्या दोन्ही सिम कार्डला रिचार्ज करावे लागेल अन्यथा तुम्ही ज्या सिम कार्डला रिचार्ज करणार नाही ते सिम कार्ड काही काळानंतर बंद पडेल.
हेही वाचा – साताऱ्यातील शेतकऱ्याने केली लालऐवजी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड; आता होतेय बक्कळ कमाई
हे सीमकार्ड बंद पडल्यानंतर नवीन ग्राहकांना तो नंबर दिला जाईल. आता याबाबत कोणता नियम लागू केला आहे हे आपण पाहणार आहोत.
एखाद्या व्यक्तीने जर सलग दोन महिने त्याच्या सिम कार्ड ला रिचार्ज केले नाही. तर त्या सिम कार्ड तुमचे कायमचे बंद केले जाऊ शकते. परंतु हे सिम कार्ड बंद केल्यानंतर लगेचच ते नवीन व्यक्तीला जात नाही. हे सिम कार्ड नवीन व्यक्तीला देण्यासाठी जवळपास सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी जातो.
आता जे लोक सिम कार्डला रिचार्ज करत नाही त्यांच्यासाठी हा कंपन्यांकडून मोठा इशारा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर त्या सिम कार्ड ला वेळोवेळी रिचार्ज केला नाही. तर तो नंबर दुसऱ्या व्यक्तीला जाण्याची दाट शक्यता आहे.