हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरातील BSNL ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने स्पष्ट केले आहे की, KYC अपडेट करण्यासंबंधी एक फसवणूक करणारी नोटीस फिरत आहे. या नोटीसमध्ये ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे सिमकार्ड बंद केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. मात्र या नोटीसीमार्फत ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
बनावट नोटीसींची फसवणूक
अलीकडे BSNL आणि TRAI च्या नावाने KYC अपडेट करण्याची मागणी करणारे संदेश आणि कॉल्स अनेक ग्राहकांना मिळत आहेत. या संदेशांमध्ये असे म्हटले जाते की, जर २४ तासांच्या आत KYC अपडेट केले नाही, तर सिमकार्ड बंद केले जाईल. मात्र BSNL ने ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
BSNL चा अधिकृत इशारा
BSNL ने आपल्या अधिकृत घोषणेत सांगितले आहे की, कंपनी अशाप्रकारच्या कोणत्याही नोटीसी ग्राहकांना पाठवत नाही. अशा फसवणुकीच्या नोटीसींच्या मागे सायबर गुन्हेगारांचा हात असतो. जे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.
KYC अपडेट फसवणुकीत OTP फ्रॉड
या फसवणुकीत एक नवीन पद्धत म्हणजे OTP फ्रॉड. फसवणूक करणारे गुन्हेगार ग्राहकांना फोन करून OTP शेअर करण्यास सांगतात, ज्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यांसह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतात. काही वेळा ते बनावट KYC अपडेट वेबसाइटवर लॉगिन करण्यास सांगतात, जिथे ग्राहकांची माहिती चोरी केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी अशा कोणत्याही फोन किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन BSNL सोबतच TRAI कडून करण्यात आले आहे.
ग्राहकांनी काय करावे?
- ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या KYC अपडेट कॉल्सवर किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका.
- तसेच, OTP, बँक माहिती किंवा अन्य गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
- BSNL कडून अधिकृत संदेश किंवा सूचना फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाइट, ग्राहक सेवा केंद्र किंवा अधिकृत अॅपद्वारेच दिल्या जातात.
- संशयास्पद संदेश किंवा कॉल्स मिळाल्यास BSNL ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
- अशा फसवणुकीला बळी पडू नये.