व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची 74 वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त पुसेगावमध्ये रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि कोरोनाच्या छायेत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथ पूजनाचा सोहळा मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. मात्र, कोरोना आणि अोमिक्राॅनमुळे अत्यंत साधेपणाने पुण्यतिथी व रथोत्सव साजरा करण्यात आला.

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री. सेवागिरी महाराजांची पुण्यतिथी निमित्त सकाळी 11 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात आले. नागरिकांनी सोशल डिस्टसिंग पाळत रथातील श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यात्रेला गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. या रथ सोहळ्याला आमदार महेश शिंदे,आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक सोहळ्यातील श्री. सेवागिरी महाराज पुण्यतिथी हा सोहळा असतो. पुण्यतिथीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. परंतु कोरोना आणि अोमिक्राॅनमुळे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे. शासनाचे नियमांचे उल्लघंन होवू नये, म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.