साधा LED Bulb की स्मार्ट LED Bulb? कोणता Bulb तुमच्यासाठी बेस्ट ?

simple LED Bulb vs Smart LED Bulb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, घरात बल्ब असणे ही आपली जीवनावश्यक गरज बनली आहे. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे एलईडी बल्ब मिळतील. यामध्ये साधे एलईडी बल्ब तर सर्वजण वापरताच, परंतु अलीकडच्या काळात स्मार्ट एलईडी बल्बची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामागील नेमकं कारण म्हणजे स्मार्ट एलईडी बल्बमध्ये देण्यात आलेले जबरदस्त फीचर्स.. तुम्ही सुद्धा घरात साधा एलईडी बल्ब घेऊ की स्मार्ट एलईडी बल्ब घेऊ याबाबत गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला दोन्ही बल्बची तुलना करून सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा की कोणता बल्ब तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

साधा एलईडी बल्ब-

साधा एलईडी बल्ब हा पांढऱ्या रंगाचा असतो. सर्वसामान्यपणे सध्या अनेक घरात हाच बल्ब पाहायला मिळतो . सध्या एलईडी बल्ब मुळे वीज बील जास्त येत नाही, तसेच या बल्बची किंमतही त्याच्या आकारानुसार, १०० ते २०० रुपयांपर्यंत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा बल्ब नक्कीच परवडणारा ठरतो. साधारण एलईडी बल्‍ब आकाराने लहान असला तरी त्याचा प्रकाश मात्र खूप मोठा पडतो.

स्मार्ट एलईडी बल्ब-

स्मार्ट एलईडी बल्ब हे आकाराने मोठे असतात तसेच त्याच्या किमती सुद्धा साधारण एलईडी बल्‍ब पेक्षा महाग असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. स्मार्ट एलईडी बल्बची किंमत ४०० पासून ते १००० रुपयांपर्यंत असते. स्मार्ट एलईडी बल्‍ब हे तुम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये खरेदी करू शकता. परंतु या एलईडी बल्बचा प्रकाश सामान्य एलईडी बल्बपेक्षा कमी असतो. खासकरून पार्टीसाठी किंवा सभोवतालच्या प्रकाशासाठी स्मार्ट एलईडी बल्ब चा वापर केला जातो.