Simple One इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ दिवशी लाँच होणार; Ola ला देणार तगडी फाईट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं फायदेशीर ठरतंय. तुम्ही सुद्धा नवी इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर पुढील महिन्यात तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन मिळणार आहे. याचे कारण म्हणजे बेंगळुरू स्थित स्टार्ट- अप सिंपल एनर्जीने पुढील महिन्यात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वन (Simple One) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 23 मे रोजी ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. चला तत्पूर्वी आपण या इलेक्ट्रिक स्कुटरची खास वैशिष्टये जाणून घेऊयात ….

236 किलोमीटरपर्यंतची रेंज- (Simple One)

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर 72Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 4.8kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 236 किलोमीटरपर्यंतची रेंज देते . याशिवाय, या स्कुटर मध्ये स्वैपेबल बॅटरीचा पर्याय देखील असेल, ज्यामुळे स्कुटरची ड्रायविंग रेंज 300 किमीपर्यंत जाऊ शकते.

फीचर्स –

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये एलईडी हेडलॅम्प, ऑनबोर्ड नेव्हिगेशन सिस्टम, 4G कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्राइव्ह मोड, म्युजिक आणि कॉलसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी अनेक दमदार फीचर्स आहेत. भारतीय बाजारात ही इलेक्ट्रिक स्कुटर Ola ला टक्कर देऊ शकते.

हे पण वाचा :

हवेत उडणारी Electric Car बाजारात दाखल; पहा किंमत आणि वैशिष्टये

MG Comet इलेक्ट्रिक कार भारतात लाँच; पहा किंमत अन् फीचर्स

KTM 390 Adventure X : KTM ने लाँच केली सर्वात स्वस्त टूरर बाइक; किंमत आणि फीचर्स पहा

Ather 450X चे नवीन बेस व्हेरियंट लाँच, 146 KM रेंज; किंमत किती?